उंबरठा शास्त्र
सद्य परिस्थितीत (काळातील) उपलब्ध जागा आणि गरज, बांधकामाचे नियम, इंच इंच जागेचा वापर करण्याची व्यासायिक जोड. वास्तूशास्त्राबाबत असलेले गैरसमज आणि अनास्था यामुळे आत्ताच्या बांधकाम ( इमारत, भवन) पद्धतीत वास्तूशास्त्र ? हा मोठा प्रश्नच आहे. शास्त्राचे ज्ञान झाल्यावर त्यानुसार वास्तूमध्ये तोडफोड करून बदल हे सुध्दा बांधकामातील नियमांमुळे बऱ्याच वेळेला इच्छा असूनही शक्य होतेच असे नाही. त्यामुळे येणाऱ्या अडचणी याचे उत्तरही अवघड होऊन बसते.
तथापि आपले ऋषीमुनी, ग्रंथकर्ते हे द्रष्टे होते. काळाच्या पलिकडे त्यांचे ज्ञान होते. काळ, परिस्थितीनुसार वास्तुशास्त्र नियमाने परिपूर्ण तर असोच पण त्या जवळपासही नियमांचा विचार करून भवन, इमारत, घर या वास्तू निर्माण करणं बांधणं सहज शक्य होणार नाही हे त्यांनी जाणले होते.
सर्वसामान्य माणसाचा जीवन संघर्ष कमी होऊन त्याला कुटुंबासह गुणात्मक उत्कर्ष होऊन भौतिक जीवनात सुख, सांपत्तिक लाभ, निरोगी शरीर, व्यक्तिनिहाय अध्यात्मिक प्रगती याचा लाभ होण्यासाठी सखोल व्यापक आणि विस्तृत शास्त्राबरोबरच अगदी साधे, सोपे, सहज असे वास्तूनियम (शास्त्र) अनेक ऋषीमुनींनी ग्रंथाद्वारे मानवी कल्याणासाठी दिले.
पाच तत्व आणि सूर्यप्रकाशाची अतिनील किरणं ( Altra Violate Rays) प्रखर, तीव्र, ताम्र किरणं ( Infra Red Rays) यांचा आठ दिशा क्रमाने पृथ्वीवरील वातावरणात होणारा परिणाम, वास्तूवर अतिसूक्ष्म पर्यंत होणारे फायदे आणि दुष्परिणाम अर्थातच अंतिम परिणाम मनुष्य, प्राणी आणि निसर्ग यावरती होणारा थेट दुष्परिणाम कमी करण्यासाठी अथवा टाळण्यासाठी विज्ञाननिष्ठ वास्तुनियम (शास्त्र) आखून दिले.
यातील एक भाग म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व लक्षात घेऊन त्या विषयी अगदी साधे, सोपे, सहज नियम दिले आहेत.



उंबरठ्यासाठी वापरले जाणारे लाकडाचे प्रकार.
सागवान
सागवान लाकूड टिकाऊ आणि मजबूत असून, या झाडावर कोणतेही पशुपक्षी आणि कीटक अन्नासाठी अवलंबून नसतात.
शिसव किंवा शिसम
लाकडाच्या उपलब्धतेनुसार तसा वापर केला जातो.
देवदार
हा प्रत्येक विभागानुसार वापर केला जातो.
खैर
दक्षिण आग्नेय दरवाजा असेल, तर खैराचे लाकूड वापरले जाते, असे म्हणतात.
फणस
दक्षिण भारत आणि कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
उंबरठा तयार करतानाचे व तयार झाल्यानंतरचे व्हिडिओ :

